पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का?'

प्रतापचंद्र सरंगी

पाकिस्तान झिंदाबाद. अफजल गुरू झिंदाबाद म्हणणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न सोमवारी केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सरंगी यांनी लोकसभेत उपस्थित केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेला सोमवारी सुरुवात झाली. त्यामध्ये सहभागी होताना प्रतापचंद्र सरंगी यांनी हा प्रश्न विचारला.

ते म्हणाले, भारत के टुकडे टुकडे करने तक जंग रहेगी, पाकिस्तान झिंदाबाद, अफजल गुरू झिंदाबाद असे म्हणणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे का?

दरम्यान, केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी लोकसभेमध्ये आधार संदर्भातील सुधारणा विधेयक सादर केले. बँकेते खाते उघडण्यासाठी आणि मोबाईल सीमकार्डसाठी स्वेच्छेने आधार कार्डचा वापर करण्यासंदर्भातील तरतूद या विधेयकात असणार आहे. या विधेयकाला गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Minister Pratap Chandra Sarangi during motion of thanks in Lok Sabha asked important question