पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळीत फटाके फोडू नका; प्रकाश जावडेकरांचा दिल्लीकरांना सल्ला

प्रकाश जावडेकर

दिल्लीमध्ये प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. याच मुद्द्यावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिवाळीमध्ये फटाके फोडू नका असा सल्ला दिल्लीतील नागरिकांना दिला आहे. मुलांनी सुध्दा स्वत:हून पालकांना फटाके खरेदी करुन नका असे सांगितले पाहिजे. जर त्यांना फटाके फोडायचे असतील तर ग्रीन फटाके फोडावे, असे प्रकाश जावडेकरांनी सांगितले आहे.

आरेच्या निर्णयाचे स्वागत, विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

'दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करण्यात मेट्रोची महत्वाची भूमिका आहे. मेट्रोची ऐवढी कामं होतात मात्र लोकांना धुळीचा सामना करावा लागला नाही, असे प्रकाश जावडेकरांनी सांगितले. तसंच, दिल्लीमध्ये २००६ नंतर प्रदूषण वाढले आहे. २०१४ पर्यंत प्रदूषणावर काहीच काम केले गेले नाही. मात्र सरकारने पर्यावरणावर अनेक क्रांतिकारक बदल केले आहेत आणि आजपासून ४६ विशेष पथके रस्त्यावर उतरणार असल्याचे ते म्हणाले.

पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीच जागावाटपात भाजपशी तडजोड - उद्धव ठाकरे

पुढे त्यांनी सांगितले की, हवेतील प्रदूषणावर सरकारची नजर आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होईल आणि बीएस-६ वाहनांनी सुध्दा प्रदूषण कमी होईल. दरम्यान, दिल्लीमध्ये प्रदूषण पिकांचे उरलेले अवशेष जाळल्याने सुध्दा होत आहे. मात्र आता पिकांच्या उरलेल्या अवशेषाचा वापर खाद्य रुपामध्ये केला जाईल, असे त्यांनी सांगितले.   

आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती