पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वे भरतीच्या ९००० जागांपैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव

केंद्रीय मंत्री पियुष गोयल

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये लवकरच ९००० जागा भरण्यात येणार आहेत. कॉन्स्टेबल आणि उप-निरीक्षक पदाच्या या जागा आहेत. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्के जागा या फक्त महिलांसाठी राखीव असतील, असे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केल्याचे एएनआयने म्हटले आहे. 

गेल्यावर्षी फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये रेल्वेत १ लाख ४० हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. येत्या दोन वर्षांत रेल्वेत आणखी एक लाख जागा भरण्यात येणार आहेत. २३ जानेवारीला रेल्वे मंत्री म्हणाले होते की, सध्या दीड लाख पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. येत्या काळात सव्वा दोन ते अडीच लाख आणखी पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय रेल्वेमध्ये एकूण ४ लाख पदे भरण्यात येणार आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Minister of Railways 50 percent of over 9000 vacancies in the railways will be for women