पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दिल्लीत सम-विषम योजना लागू करण्याची गरज वाटत नाही'

नितीन गडकरी

दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीमध्ये सम-विषम योजना लागू करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सम-विषम योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

भाजपशी युतीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केले महत्त्वाचे वक्तव्य

केजरीवाल सरकारच्या निर्णयावर विचारलेल्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी सांगितले की, 'दिल्लीमध्ये सम-विषय योजना लागू करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. आम्ही जो रिंग रोड तयार केला आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. तसंच आमच्या योजनेमुळे येत्या दोन वर्षात दिल्ली प्रदूषण मुक्त होईल.' असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. 

भाजपमध्ये प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी केले ट्विट... वाचा काय

राजधानी दिल्लीमध्ये सम-विषम नियम येत्या ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान लागू होणार आहे. दिल्लीतील प्रदूषणाला लक्षात घेता केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील रस्त्यावर ४ नोव्हेंबरला सम क्रमांकाच्या गाड्या धावतील. तर ५ नोव्हेंबरला विषम क्रमांकाच्या गाड्या धावतील. तसंच प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ऑक्टोबरपासून दिल्ली सरकार मास्कचे वाटप करणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत केला प्रवेश