पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पीओकेचा भारतात समावेश करणे हेच मोदी सरकारचे पुढचे काम'

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आता केंद्र सरकारच्या अजेंड्यावर पाक व्याप्त काश्मीर (पीओके) आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारचे पुढचे लक्ष्य हे पीओके भारताचा अभिन्न अंग करण्याचा असल्याचे ते म्हणाले. उधमपूर-कठुआ लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे जितेंद्र सिंह यांनी पीओकेवर म्हटले की, ही केवळ माझी किंवा माझ्या पक्षाची प्रतिबद्धता नाही. तर १९९४ मध्ये पी व्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारकडून सर्वसंमतीने संमत करण्यात आलेला हा संकल्प आहे. हा एक स्वीकार्य दृष्टीकोन आहे.

कलम ३७० च्या बहुतांश तरतुदी संपुष्टात आणल्यानंतर पाकिस्तानकडून दुष्प्रचार केला जात आहे. यावर जितेंद्र सिंह म्हणाले की, जगातील इतर देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अनुकूल आहे. काही देश जे भारताच्या भूमिकेबाबत सहमत नव्हते. तेही आता भारताच्या मताशी सहमत आहेत. काश्मीरमधील सर्वसामान्य लोक त्यांना मिळत असलेल्या लाभांमुळेही खूश आहेत.

ट्रॅफिक पोलिसांनी वाद घातल्याने सॉफ्टवेअर तंत्रज्ञाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ते पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये ना बंद आहे ना संचारबंदी आहे. तिथे फक्त काही निर्बंध घालण्यात आले आहेत. देश विरोधी लोकांनी काहीही करुन वाचलो जाऊ शकतो ही मानसिकता बदलली पाहिजे. 

काश्मीरमध्ये हळुहळु स्थिती सामान्य होत आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याबाबत ते म्हणाले की, ही सेवा लवकरात लवकर देण्याची आमची इच्छा आहे. एकदा हा प्रयत्न करण्यात आला पण सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ टाकण्यात येऊ लागले. त्यामुळे या निर्णयाची पुन्हा एकदा समीक्षा करावी लागली. सरकार हे निर्बंध संपुष्टात आणणे आणि इंटरनेटवरील बंदी हटवण्यासाठी इच्छुक आहे.

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न