पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ नोव्हेंबरला करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ नोव्हेंबरला करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन

बहुप्रतीक्षीत करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी टि्वट करुन दिली. दरम्यान, पाकिस्तानकडून कॉरिडॉरच्या शुभारंभाची तारीख अजून ठरले नसल्याचे म्हटले होते. पण पाकिस्तानने गुरुनानक देव यांच्या ५५० व्या प्रकाश पर्व (१२ नोव्हेंबर) पूर्वी हे कॉरि़डॉर भाविकांसाठी उघडण्यात येईल असेही सांगितले होते.

मोदी-जिनपिंग बैठकः भारताचे कूटनीतिक यश, काश्मीरवर चकार शब्द

पाकिस्तानने म्हटले की, ९ नोव्हेंबरपासून शीख भाविक करतारपूर साहिबला जाऊ शकतील. हा कॉरिडॉर करतारपूरमध्ये दरबार साहिबच्या गुरदासपूरच्या डेराबाबा नानकशी जोडले जाईल. भारतीय भाविक केवळ एक परमिट घेऊन साहिबला जाऊ शकतील. १५२२ मध्ये गुरुनानक देव यांनी याची स्थापना केली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले होते. मोदींशिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही येऊ शकतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही आमंत्रित केले जाईल, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी सांगितले होते. परंतु, अमरिंदर सिंग यांनी मनमोहन सिंग यांच्याकडून आमंत्रण स्वीकारण्याचे वृत्त फेटाळले होते.

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या पीएची आत्महत्या

अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती, आणि सुलतानपूर लोधी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. दोघांनीही हे निमंत्रण स्वीकारले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Minister Harsimrat Kaur Badal Tweet PM Modi inaugurate Kartarpur Corridor on 8 November