पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील प्रत्येक शाळेत गीता शिकवली पाहिजे - गिरीराज सिंह

गिरीराज सिंह

देशातील प्रत्येक शाळेमध्ये भगवदगीता शिकवली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले. पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या मिशनरी शाळांमध्ये घालतात. तिथे शिकून ही मुले पुढे आयआयटीत जातात आणि नंतर परदेशात निघून जातात. त्यापैकी अनेक जण नंतर गोमांस खाऊ लागतात. एवढे सगळे घडते कारण आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा शिकवत नाही, असेही त्यांनी सांगितले.

मी निष्ठावान शिवसैनिक आहे आणि कायम राहणार: रावते

गिरीराज सिंह हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गिरीराज सिंह यांनी याआधी २०२५ पर्यंत आपल्याकडे १० कोटी गायी असतील असे म्हटले होते. त्यामुळे दूध उत्पादनात भारत स्वयंपूर्ण झालेले असेल आणि आपण त्यावेळी दूधाची निर्यात करू, असे त्यांनी म्हटले होते. देशातील शेतकऱ्यांना सव्वा ते दीड लाख रुपयांचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले होते. 

'प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथास मुद्दाम डावललं'

शाळेमध्ये गीता शिकवली पाहिजे, या विषयावरून काही वर्षापूर्वी दोन्ही टोकाची मते मांडली गेली होती. हा विषय आता पुन्हा एकदा गिरीराज सिंह यांनी चर्चेत आणला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:union minister giriraj singh says bhagavad gita should be taught in every school in the country