सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ आयोजित जनसभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये संभ्रम निर्माण करुन ममता बॅनर्जी यांनी राज्यात दंगल घडवली, असा आरोप शहांनी केला. कोलकाता येथील जनसभेत ते बोलत होते.
'मुंबईत शिवसेना नंबर एक तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवी'
अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. या कायद्यामुळो लाखो बंगालींना नागरिकत्व मिळणार आहे. ममता बॅनर्जी या काद्याला विरोध करत आहेत. त्यांनी बंगालमध्ये दंगली घडवल्या. रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्या जाळण्यात आल्या. आम्ही नागरिकत्व देणारा कायदा आणला असताना तुम्ही त्याला विरोध का करत आहात? असा सवालही त्यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांना केला. तुम्हाला घुसखोर आपले वाटत असतील पण आम्ही ७० वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असलेल्या शर्णार्थींना न्याय देणारच, असेही असेही शहा यांनी म्हटले आहे.
'राममंदिरामुळे लोक मतदान करतील या भ्रमात राहू नका'
यावेळी शहा यांनी राममंदिराचा मुद्दावरही भाष्य केले. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी ५०० वर्षांपासून लढा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर तीर्थ क्षेत्र असेल, अशी घोषणा केली आहे. बसपा आणि ममता बॅनर्जी यांनी यातही अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही मोदींना ताकद दिल्यामुळे आज राममंदिराच्या मुद्यावर तोडगा निघाला आहे, असे सांगत सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे संभ्रमित होऊ नका, असा विश्वास अमित शहांनी जनतेला देण्याचा प्रयत्न केला.