पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात आतापर्यंत २२३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले: आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल

देशात मागील २४  तासांत कोरोना विषाणूची लागण झालेले १३२४ नवे रुग्ण आढळले असून २७ रुग्णांचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतामध्ये परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ७१२ वर पोहचली आहे. 

'त्या' निर्लज्ज राज्यपालांची आठवण झाली, संजय राऊत यांचा निशाणा

आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-१९ च्या संसर्गामुळे आतापर्यंत ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२ हजार ९७४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर २ हजार २३१ रुग्णांना उपचारानंतर बरे झाले आहेत. यासोबतच, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील २३ राज्य/ केंद्र शासित प्रदेशातील ५४ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. 

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना सशर्त परवानगीः उद्धव ठाकरे

दरम्यान, देशामध्ये कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये ७०, गुजरातमध्ये ५३, उत्तर प्रदेशमध्ये १४ आणि दिल्लीमध्ये ४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ३ हजार ६५१ रुग्ण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीमध्ये १ हजार ८९३ रुग्ण आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून त्याठिकाणी १ हजार ४०७ रुग्ण आढळले आहेत. 

अमेरिका एक-एक मृत्यूचा बदला घेणार?, ट्रम्प यांनी दिली चीनला धमकी