पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीन, इराण, सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा सल्ला

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन

देशामध्ये कोरोना विषाणूची दोन नवीन रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने नवीन प्रवासी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार सध्या चीन आणि इराणला जाणाऱ्यांना व्हिसा देण्यात येणार नाही. तसेच, परिस्थिती अधिक गंभीर झाली तर इतर देशांसाठीही प्रवासी निर्बंध घातले जाऊ शकतात, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली.

दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह

तसंच, 'भारतीयांनी आवश्यकता नसेल तर चीन, इराण, कोरिया, सिंगापूर आणि इटलीचा प्रवास करणे टाळावे, असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने सोमवारी भारतात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. एक रुग्ण दिल्ली तर दुसरा रुग्ण तेंलगणा येथे आढळल्याची माहिती आरोग्य मंत्र्यालयाने दिली होती.

दिल्ली हिंसाचार : IBचे अधिकारी अंकित शर्मांच्या कुटुंबियांना एक कोटी

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीत कोरोनाचा जो रुग्ण आढळून आला आहे, तो नुकताच इटलीतून आला आहे. या रुग्णावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तेलंगणा येथे आढळलेला दुसरा रुग्ण दुबईतून आला आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

इशांत शर्माची दुखापत द्रविड यांना गोत्यात आणणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:union health minister harsh vardhans advise indians to avoid non essential travel to china iran singapore