पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रमादित्यवर राजनाथ सिंह म्हणाले, २६/११चा हल्ला विसरणार नाही

विक्रमादित्यवर राजनाथ सिंह म्हणाले, २६/११चा हल्ला विसरणार नाही (ANI)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. भारताला अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान दहशतवादाचा उपयोग करत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला. यावेळी त्यांनी २६/११ हल्ल्याचा उल्लेख केला. आम्ही २६/११ चा हल्ला विसरु शकत नाही. एखादी चूक झाली असेल तर ती पुन्हा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

भारताला बुद्ध नव्हे संभाजी महाराज पाहिजेतः संभाजी भिडे

राजनाथ सिंह यांनी रविवारी आयएनएस विक्रमादित्यवर सुरक्षादलाच्या जवानांबरोबर योगासन केले. याचदरम्यान त्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले आणि कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आमचे नौदल आणि तटरक्षक दल नेहमी अलर्ट असतात, असे ते म्हणाले. 

यापूर्वीही राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला १९७१ ची चूक पुन्हा करु नका, असा इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, पाकिस्तानला वारंवार १९६५ आणि १९७१ ची चूक पुन्हा करु नका असे सांगितले आहे. १९७१ च्या युद्धात त्यांचे दोन तुकडे झाले होते. बांगलादेशाच्या रुपाने नवा देश समोर आला होता. त्यामुळे १९७१ ची चूक पुन्हा केल्यास पीओकेचे काय होईल, हे लक्षात घ्या. 

दरम्यान, २०१३ मध्ये आयएनएस विक्रमादित्य नावाच्या विमानवाहक नौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. आयएनएस विक्रमादित्य देशाच्या सुरक्षिततेसाठी समर्पित करतानाच देशाची मारक क्षमता ५०० किमी झाली आहे. आता भारताचा मोजक्या दोन ते तीन देशांत समावेश होतो, ज्यांच्याकडे शक्तिशाली दोन विमान वाहक युद्धनौका आहे. विक्रमादित्यचा व्यवहार अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झाला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Defence Minister Rajnath Singh onboard INS Vikramaditya We know it very well that Pakistan uses terrorism as a tool to destabilise India