लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेटने १६ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव संमत करण्यात आला. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला जबरदस्त यश मिळाले आहे. कॅबिनेटची शिफारस प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे वर्तमान लोकसभा भंग करण्याची कारवाई करतील. दरम्यान, प्रकृती अस्वास्थामुळे अरुण जेटली हे कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थितीत राहू शकले नाहीत.
Union Cabinet passes resolution to dissolve the 16th Lok Sabha. pic.twitter.com/wmvWKusb7E
— ANI (@ANI) May 24, 2019
१६ व्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी समाप्त होणार आहे. १७ वी लोकसभा ३ जून पूर्वी गठीत केल्यानंतर नव्या सदनाची प्रक्रिया ही तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून नवनिर्वाचित सदस्यांची सूची सोपवतील तेव्हा सुरु होईल.
मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेगाने धावेल
या बैठकीला सुषमा स्वराज, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, मेनका गांधी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर आदी उपस्थितीत होते.