पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकरच नव्या रुपातील नाणी चलनात - अर्थमंत्री

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात लवकरच एक, दोन, पाच, दहा आणि २० रुपयांची नवी नाणी चलनात येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्चलाच या नाण्याचे अनावरण केले आहे. पण अद्याप ती चलनात आलेली नाहीत. लवकरच ती वापरासाठी नागरिकांना उपलब्ध होतील, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

Budget 2019 काय स्वस्त अन् काय महागलं!

चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडला. यावेळी करप्रस्तावातील तरतुदी जाहीर करताना त्यांनी ही घोषणा केली. नवी नाणी ही दृष्टिहिनांचा विचार करून तयार करण्यात आली आहेत. त्यांना ही नाणी लगेचच ओळखता येतील, असे त्यांनी सांगितले.

नव्या रुपातील सर्व नाण्यांवर अशोकस्तंभ असणार आहे. त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिण्यात आलेले असेल. भारत आणि इंडिया हे दोन्हीही शब्द या नाण्यावर असतील. याआधी दहा वर्षांपूर्वी १० रुपयांचे नाणे चलनात आले होते. त्यानंतर आताच नव्या रुपातील नाणी चलनात येत आहेत.