पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या त्या प्रश्नावर PM मोदींनी असा दिला रिप्लाय

नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी २०२०-२१ या अर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. हा अर्थसंकल्प व्हिजन आणि अ‍ॅक्शन असलेला आहे, असे मोदींनी म्हटले आहे. मोदी म्हणाले की, शतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच १६ अ‍ॅक्शन पाँइंट्सच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील नव्या सुधारणा अर्थव्यवस्थेला गती देण्यास उपयुक्त ठरतील. यामुळे प्रत्येक नागरिक अर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय. 

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पात रोजगाराची तरतूदच नसल्याचे सांगत मोदी सरकरावर निशाणा साधला होता. राहुल गांधीचा हा दावा मोदींनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. शेती, पायाभूत सुविधा, वस्त्रोद्योग आणि तंत्रज्ञान ही रोजगार निर्मितीची मुख्य केंद्रे आहेत. या चारही घटकांवर अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आल्याचे मोदींनी म्हटले आहे.  

तरुणांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. नव्या स्मार्ट सिटीज, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, बायो तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. याशिवाय स्टार्टअप आणि आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कर सवलत देण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल, असे मोदी म्हणाले. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना रोजगार निर्मितीसंदर्भातील मुद्दे सांगत राहुल गांधीना एका अर्थी उत्तरच दिले आहे.  

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Budget 2020 PM Narendra Modi praise Nirmanala Sitaraman Also answer Rahul Gandhi Question on Budget 2020