पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वडिलांच्या निधनानंतरही त्या अधिकाऱ्याकडून कर्तव्याला प्राधान्य, अर्थमंत्र्यांकडून कौतुक!

अर्थसंकल्प २०२०

केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी सकाळी लोकसभेत मांडला जाणार आहे. पण त्याआधी शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारमधील अधिकारी कुलदीप कुमार शर्मा यांचे विशेष कौतुक केले. कर्तव्य आधी आणि नंतर वैयक्तिक आयुष्य याचे उदाहरण कुलदीप कुमार शर्मा यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यामुळेच त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

अर्थसंकल्प २०२० : ... या मुद्द्यांकडे असणार सर्वांचे लक्ष

कुलदीप कुमार शर्मा हे केंद्रीय मुद्रणालयात उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे यावेळी अर्थसंकल्पाच्या छपाईची जबाबदारी आहे. हाच छपाई केलेला अर्थसंकल्प शनिवारी संसदेत मांडण्यात येणार आहे आणि नंतर त्याचे वितरण संसदेचे खासदार, पत्रकार यांना करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प मांडण्याआधी त्यातील कोणत्याही तरतुदी कोणालाही कळू नये, यासाठी खास खबरदारी घेतली जाते. यासाठीच अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम सुरू झाल्यानंतर त्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना या काळात आपल्या घरी जाता येत नाही. त्यांच्याकडील संपर्काची सर्व माध्यमे काढून घेतली जातात. त्यांना विशेष सुरक्षेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत राहावे लागते.

यावेळी कुलदीप कुमार शर्मा यांच्यावर अर्थसंकल्पाच्या छपाईची सर्व जबाबदारी आहे. हेच छपाईचे काम सुरू असताना कुलदीप कुमार शर्मा यांच्या वडिलांचे २६ जानेवारी रोजी निधन झाले. आपल्या वैयक्तिक आयुष्यात एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही कुलदीप कुमार शर्मा यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांनी कोणतेही कारण न देता छपाईचे ठिकाण न सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्यासाठी अर्थसंकल्पाची गोपनीयता जास्त महत्त्वाची आहे, याचेच उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

कोरोना विषाणू : ३२४ भारतीयांना चीनमधून विशेष विमानानं परत आणले

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वडिलांचे निधन झाल्यानंतरही कुलदीप कुमार शर्मा यांनी छपाईची जागा न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कामातून एक मिनिटाचीही सूट मागितली नाही. वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कठीण प्रसंगातही त्यांनी आपल्या कामाबद्दल निष्ठा दाखवली, असे म्हणत निर्मला सीतारामन यांनी त्यांचे कौतुक केले.