पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तरुणांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

राहुल गांधी

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प हा देशातील तरुणांची निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. सध्याच्या घडीला देशात बेरोजगारी हीच मोठी समस्या आहे. सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये यांसंदर्भात कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.  

Union Budget 2020: जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

राहुल गांधी म्हणाले की, हा अर्थसंकल्प दिशाहिन आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात हा निर्थक असाच आहे. रोजागार निर्मितीसंदर्भात यात कोणतीही तरतूद नाही. बेरोजगारीची समस्येवर तोडगा काढण्यासंदर्भा सरकार कोणताही सकारात्मक विचार करत नसल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येते. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन भरकटल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे. 

Union Budget 2020:निर्मला सीतारामन यांचं भाषण ठरलं रेकॉर्ड ब्रेक,पण..

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. सर्व सामान्यांनांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्व सामान्यांना जे हवे आहे ते या अर्थसंकल्पातून देण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. २ तास ४० मिनिटांहून अधिक काळ भाषण करत त्यांनी नवा विक्रमही प्रस्थापित केला.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union budget 2020 21 I didnt see any strategic idea that would help our youth get jobs Rahul Gandhi on Budget