पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... असा वाचवा तुमचा प्राप्तिकर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. चालू आर्थिक वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या करटप्प्यांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नसले, तरी प्राप्तिकर वाचविण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी देशाच्या विकासासाठी प्रामाणिक करदात्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले आहेत.

अर्थसंकल्पात 'स्टडी इन इंडिया', 'गांधीपीडिया'चा संकल्प

प्राप्तिकर वाचविण्यासाठी नवे काय?

१. इलेक्ट्रिक वाहने
इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी जर तुम्ही कर्ज घेतले असेल, तर त्याचा फायदा तुम्हाला प्राप्तिकरात होऊ शकतो. कारण या कर्जावर प्राप्तिकरात दीड लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. 

२. नवे घर
४५ लाख रुपयांपर्यंतचे नवे घर घेणाऱ्यांनाही प्राप्तिकरात आणखी सवलत मिळणार आहे. असे घर घेण्यासाठी तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर त्याच्या व्याजावर तुम्हाला आणखी दीड लाख रुपयांची सवलत मिळणार आहे. गृह कर्जावरील व्याजावर प्राप्तिकरात सध्या दोन लाख रुपयांची सवलत आहे. त्यामध्ये अशा करदात्यांसाठी आणखी दीड लाख रुपयांची सवलत मिळणार आहे. याचाच अर्थ गृहकर्जावरील व्याजावर एकूण सवलत साडेतीन लाख रुपये होणार आहे.

Budget2019 : पेट्रोल-डिझेल महागले, शेवटच्या मिनिटांत अर्थमंत्र्यांचा दणका!

३. स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक
जर तुम्ही स्वतःचे घर विकले असेल आणि त्यातून तुम्हाला भांडवली नफा (कॅपिटल गेन) होत असेल, तर त्यावर द्यावा लागणारा प्राप्तिकर वाचविण्यासाठीही निर्मला सीतारामन यांनी तरतूद केली आहे. यामध्ये भांडवली नफ्यातून स्टार्ट अप्समध्ये केलेल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकरात सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

४. पाच लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकर नाही
पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकरात सवलत देण्याचे तत्कालिन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात जाहीर केले होते. तो प्रस्ताव कायम राहणार आहे. अर्थात त्यावेळी या सवलतीवर मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले होते. पण त्यावर निर्मला सीतारामन यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.