अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलसह काही वस्तू महागल्या आहेत. तर काही वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. जाणून घेवूयात कोणत्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत आणि कोणत्या वस्तून स्वस्त झाल्या आहेत.
सोने-चांदी महागले
सोने-चांदीवरील सीमा शुल्कात १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. परिणामी सोने-चांदी महागणार आहे.
पुस्तकांसाठी मोजावी लागणार अधिक किंमत
विदेशी पुस्तकांवर ५ टक्के सीमा शुल्क आकारण्यात येणार असल्यामुळे बाहेरुन मागवण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या किंमती वाढणार आहेत.
पेट्रोल-डिझेलमध्ये भडकले
पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार वाढवल्याने इंधन दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ झाली आहे.
Budget 2019 : पेट्रोल-़डिझेल महागले, शेवटच्या मिनिटांत अर्थमंत्र्यांचा दणका!
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागल्या
आयात करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशिन यासारख्या आयात वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.
इलेक्ट्रिकल वाहने स्वस्त
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील जीएसटी १२ टक्क्यांवरू ५ टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्टिकल वाहनांची किंमत कमी होईल.
Budget 2019 डबल धमाका! इलेक्ट्रिकल वाहनांसह गृहकर्जदाराला 'गिफ्ट'
घर खरेदीदारांना दिलासा
४५ लाख किंमतीच्या आतील घर घेणाऱ्यांना दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी घर खरेदी स्वस्त होणार आहे.
महाग वस्तू : सोने, सीसीटीव्ही, ऑटो पार्ट्स, मार्बल टाइल्स, पीवीसी, पुस्तके, पेट्रोल-डिझेल, काजू, मेटल फिटिंग, सिंथेटिक रबर, डिजिटल व्हिडिओ कॅमेरा
स्वस्त वस्तू : संरक्षण उपकरणे, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रिकल वाहन, ४५ लाखांच्या आतील घर