पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2019 : निर्मला सीतारामन यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल...

निर्मला सीतारामन

देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी लोकसभेमध्ये आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या आधी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी होती. पण त्या पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या.

Budget 2019 : सीतारामन यांच्यापुढे ही आहेत आव्हाने

मोदी सरकार २.० मध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडे कंपनी कामकाज मंत्रालयाची जबाबदारी सुद्धा आहे. याआधीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती. २०१७ मध्ये त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

राजकीय जीवन
२००६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश
२००८ ते २०१४ पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम बघितले
२०१६ मध्ये स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्री म्हणून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश
२०१७ संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी
आंध्र प्रदेश येथून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत.

'आर्थिक सर्व्हेने ५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा रोडमॅप तयार केला'

जन्म आणि शिक्षण
१८ ऑगस्ट १९५९ मध्ये निर्मला सीतारामन यांचा जन्म मदुराईमध्ये झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेत काम करीत होते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे लहानपण गेले.

१९८० मध्ये अर्थशास्त्र विषय घेऊन त्यांनी बीए ही पदवी घेतली.

निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकाल प्रभाकर हे राईट फोलियो कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत.

प्राइसवॉटरहाऊसमध्ये त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. काही वर्षे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठीही काम केले आहे. 

भारतात सार्वजनिक धोरण अभ्यास केंद्रामध्ये उपसंचालक म्हणून कामही केले आहे.