पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2019: कराचा भार वाढवणारा अर्थसंकल्प, पी. चिदंबरम यांची टीका

पी. चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्प समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे. समाजातील कोणत्याचा वर्गाचा अर्थसंकल्पात विचार केलेला नाही. उलट कराचा भार वाढवला आहे, अशी टीका त्यांनी केली.

सशक्त भारतासाठी सर्वसमावेशक संकल्प 

चिदंबरम म्हणाले की, ' यापूर्वी कधी वित्तीय घट, एकूण खर्च याच्या उल्लेखाशिवाय अर्थसंकल्प कधी सादर झाला आहे का? आतापर्यंत अर्थसंकल्पामध्ये अशी परंपरा नव्हती. त्यामुळे आम्ही स्तब्ध आहोत" अशा शब्दांत त्यानी नुकत्याच सादर करण्यात आलल्या अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

लवकरच नव्या रुपातील नाणी चलनात - अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना चिदंबरम पुढे म्हणाले की,  'सामान्य जनतेचा विचार न करता आणि अर्थकारणातील अभ्यासूंचा सल्ला न घेताच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्व स्तरातील लोकांचा भ्रमनिरास करणारा आहे." केद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्याच वर्गाचा विचार केलेला नाही उलट वस्तू आणि इंधनावरील कर वाढवण्यात आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.