पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला

भाजप खासदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना वारंवार समोर येत आहे. बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी भाजप खासदाराच्या घरावर बॉम्ब फेकत गोळीबार केला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बराकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. बॉम्ब आणि गोळीबाराचा आवाजानंतर परिसरामध्ये दहशत पसरली. सुदैवाने या हल्ल्यामध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही तसंच कोणी जखमी झाले नाही.

राष्ट्रवादीला पुन्हा मोठा धक्का, सचिन अहिर शिवसेनेत

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेला राजकीय वाद अजूनही सुरुच आहे. भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या भाटपारा येथील घराच्या बंगल्याबाहेर बॉम्ब फेकण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी गोळीबार देखील केला. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. परगना जिल्ह्यातील जगतदल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केला आहे. या हल्ल्यामागे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा

दरम्यान, पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा मुद्दा संसदेमध्ये देखील उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन संसदेमध्ये गोंधळ देखील झाला होता. मागच्या महिन्यामध्ये पश्चिम बंगालच्या परगना जिल्ह्यातील भाटपाडा येथे राजकीय हिंसाचारामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावरुन राजकारण तापले होते. पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी भाजप खासदार एस. एस. अहलूवालिया यांनी गृहमंत्री अमित शहा यांना अहवाल पाठवला होता. 

'कमलनाथ यांचे सरकार पडले तर आम्हाला जबाबदार धरू नका'