पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित डोवल यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये मोठ्या मोहिमेची तयारी

अजित डोवल

जम्मू काश्मीरमध्ये १० हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आल्यानंतर लष्कारालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम राबली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सीआरपीएफच्या जवानांना तैनात केल्यानंतर अनेक चर्चा रंगत असताना उच्च पदस्थ सूत्रांनुसार दहशतवादाविरोधी कठोर पावले उचलण्याच्या दृष्टिने हे सर्व प्रयत्न सुरु आहेत.  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी सुरु आहे. काश्मीर दौऱ्यानंतर डोवल सातत्यपूर्ण उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेत आहेत. दक्षिण काश्मीरमधील दहशतवादांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हालचालींना वेग आल्याचीही चर्चा आहे. लष्कराच्या आक्रमक भुमिकेनंतर दहशतवादी संघटनेत भरती प्रक्रिया सुरु केली. मात्र, दहशतवादी संघटना लष्कराच्या तुलनेत सध्या बॅकफूटवरच आहेत.  

डोवल परतताच काश्मीरमध्ये पाठवले १० हजार जवान, मेहबुबा संतापल्या

यावर्षीच्या ३१ मे पर्यंत काश्मीर खोऱ्यात ५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे सर्व याच वर्षी दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या दहशतवाद्यांची भरतीला सुरुंग लावण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे.आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानी दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये घातपात घडवून आणण्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिलीमुळे देखील केंद्र सरकारने काश्मीरमध्ये अतिरिक्त जवान तैनात केली असावी, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.  

'२०२४ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था'

काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांचे बदलते सूर पाहता केंद्र सरकार जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम ३५ अ संदर्भातील मुद्दा निकाली काढण्याच्या दृष्टिनेही या घडामोंडी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: under the leadership of ajit doval preparing for big campaign against terrorists in kashmir