पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमदाराच्या 'बॅटिंग'वर मोदी नाराज; म्हणाले, अशांना पक्षात स्थान नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंदूरचे भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने केलेली मारहाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रुचलेली नाही. आकाश यांचे नाव न घेता मोदींनी आपली नाराजी जाहीर केली. दिल्लीत मंगळवारी भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी दुर्व्यवहार करणाऱ्या नेत्यांप्रती आक्षेप नोंदवला. राजकारणात शिस्त असली पाहिजे. गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नसून अशांना पक्षातून काढून टाकले पाहिजे. अशी वर्तणूक करणारे भले कोणाचेही मुले असतील. पण त्यांना मनमानी करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे खडे बोल मोदींनी बैठकीत सुनावले.

कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाची पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

आमदार आकाश हे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत. मोदींनी आपल्या भाषणात कोणाचे नाव घेतले नाही. पण आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या प्रकरणावरच त्यांचे हे वक्तव्य होते, असे मानले जात आहे. आकाश विजयवर्गीयने अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकातील एक अधिकाऱ्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला होता. या घटनेवर मोठा वाद झाला होता. याप्रकरणी आकाशला कारागृहातही जावे लागले होते. 

भाजपच्या 'बॅट्समन' आमदाराला जामीन

जामिनावर सुटल्यानंतरही आकाश यांची वर्तणूक ही मस्तवालासारखी होती. अशाच पद्धतीने जनतेची सेवा करणार असल्याचे ते म्हणाले होते. मी जनतेची सेवा करत राहिल. कारागृहात चांगला वेळ गेला. जेव्हा पोलिसांसमोरच एखाद्या महिलेला ओढत नेले जात होते. अशावेळी मी काहीच विचार करु शकलो नसतो. त्यामुळे मी जे काही केले त्यावर मला खेद नाही. पण मी देवाला जरुर प्रार्थना करेन की मला पुन्हा बॅटिंग करण्याची संधी मिळू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.