पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मिरवर सुरक्षा परिषदेत बंद दरवाजाआड चर्चा

काश्मिरमधील सुरक्षा जवान

कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय आणि काश्मिरमधील परिस्थिती यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये शुक्रवारी बंद दरवाजाआड चर्चा होणार आहे. या विषयावर औपचारिकपणे आणि खुल्या स्वरुपात चर्चा व्हावी, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. पण सुरक्षा परिषद या प्रकरणी बंद दरवाजाआड चर्चा करणार आहे. या संपूर्ण घटनाक्रमाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी 'हिंदुस्थान टाइम्स'ला ही माहिती दिली.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

काश्मिरच्या मुद्द्यावर तातडीने सुरक्षा परिषदेची बैठक बोलाविण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. त्याला पाकिस्तानचा समर्थक असलेला देश चीनने तातडीने पाठिंबा दिला. कलम ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मिरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. संसदेने याला मंजुरी दिली आहे. 

पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा देताना चीनने म्हटले आहे की, १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने भारत-पाकिस्तानमधील या विषयावर चर्चा केली पाहिजे. त्याचबरोबर राजकीय आणि शांतता निर्मिती विभागाने या विषयावर काय काम केले याचे निवेदन त्यांना करण्यास सांगितले पाहिजे. 

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अंशतः सुरू

संयुक्त राष्ट्रातील पोलंडचे कायम प्रतिनिधी आणि सध्याच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष जोआन्ना रोनेका यांनी या विषयावर १६ ऑगस्ट रोजी बंद दरवाजाआड चर्चा होईल, असे सांगितल्याचे जिओ वृत्तवाहिनीने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये पोलंडकडे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आहे. हे अध्यक्षपद फिरते असते.