पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या 'जवान प्रेमी'ने पुलवामातील शहीदांना वाहिली अनोखी श्रद्धांजली

उमेश जाधव

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांनी हौतात्म पत्करले होते. या शहीद जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बंगळुरुच्या उमेश गोपीनाथ जाधव यांनी शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात उमेश जाधव यांनी ४० शहीद जवानांच्या घरी भेट दिली. एवढेच नाही तर जवानांच्या जन्मभूमीत जाऊन त्यांनी स्मशान आणि घरातून माती गोळा केली. यासाठी त्यांनी जवळपास ६१ हजार किमी प्रवास केला.

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला, तपासात काय समोर आलं? राहुल गांधींचा सवाल

शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहणाऱ्या उमेश जाधव यांचा लष्कारानेही सन्मान केलाय. श्रीनगरमधील सीआरपीएफच्या लेथपोरा कॅम्पमध्ये आयोजित शहीद जवानांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.  मागील वर्षी १४ फेब्रुवारीला उमेश जाधव अजमेरमधील एका संगीताच्या कार्यक्रमानंतर बंगळुरुस्थित आपल्या घरी जात होते. जयपूर विमानतळावरील टीव्हीवर त्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाल्याची बातमी पाहिली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेनंतर त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी काही तरी करायचे  ठरवले. यातूनच त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट देण्याचा संकल्प केला. आणि तो तडीस नेला.    

पुलवामा हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासात घट 

उमेश जाधव यांच्यासाठी प्रत्येक शहीद जवानांच्या घरापर्यंत पोहचण्याचा संकल्प सहज आणि सोपा नव्हता. देशभक्तीचे नारे लिहिलेल्या कारमधून त्यांनी ६१ हजार किमी पल्ला पूर्ण केला. यावेळी हॉटेलमध्ये थांबण्यासाठी लागणारा पैसा वाचवण्यासाठी त्यांनी कारमध्येच विसावा  घेत हा प्रवास पूर्ण केला.  शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या भेटीसंदर्भात ते म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांना श्रंद्धाजली म्हणून मी हा संकल्प केला होता. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सामील झालो याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Umesh Gopinath Jadhav who collect soil from all Pulwama martyrs house and meet their family members