पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळले, १७६ मृत्युमुखी

घटनास्थळाचा फोटो

इराणची राजधानी तेहरानजवळ युक्रेनचे एक प्रवासी विमान कोसळल्याची माहिती इराणमधील सरकारी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. या विमानामध्ये वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण १८० जण होते. तेहरानमधील विमानतळाजवळच ही घटना घडल्याची माहिती आहे. या विमानातील १७६ प्रवासी मृत पावल्याची माहिती इराणमधील सरकारी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. विमानाच्या इंजिनात मोठा बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. त्याचा इराणमधील सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नसल्याचे इराणमधील युक्रेनच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बोईंग ७३७ बनावटीचे हे विमान युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचे होते. तांत्रिक कारणामुळे ते कोसळल्याची माहिती मिळाली आहे. तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते कोसळले. कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आगीचा भडका उडाल्याचे दिसते आहे. आग विझवण्यासाठी तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ukrainian airplane carrying 180 passengers and crew has crashed near airport in capital Tehran