पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. बोरिस यांची प्रकृती खालावली असून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बोरिस  यांना कोरोनाची लागण होऊन दहा दिवस पूर्ण झाले आहेत. डॉक्टरांच्या एका चमूच्या देखरेखीखाली बोरिस यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती सोमवारी दुपारी खालावली त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. 

 

राज्यातील ८७% कोरोनाबाधित रुग्ण मुंबई-पुण्यात

 बोरिस हे आयसीयूत असल्यानं त्यांच्या पदाची संपूर्ण जबाबदारी परराष्ट्रमंत्री डोमनिक रॉब यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांनी देशातील जनतेला पत्राच्या माध्यमातून आवाहन केले,  'घरात सुरक्षित राहा. परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.' अशी विनंती त्यांनी पत्रातून केली होती.

ब्रिटनमध्ये गेल्या ३ आठवड्यांपासून लॉकडाऊन आहे. इथल्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार इथे विषाणूची बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ५ हजार ३७३ वर पोहोचली आहे. तर विषाणूबाधित रुग्णांची संख्या ही ५१ हजार ६८ आहे.

औषधांचा पुरवठा न केल्यास भारताला जशास तसे उत्तर देऊ: ट्रम्प