पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरे यांचा प्रस्तावित अयोध्या दौरा तूर्त लांबणीवर

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे

राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार असले, तरी त्यांच्यातील चर्चेला अद्याप अंतिम रूप मिळालेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्त लांबणीवर पडला आहे. उद्धव ठाकरे या महिन्यात २४ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती होती. पण त्याचवेळी खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप तारीख निश्चित झालेली नसल्याचे म्हटले होते. पण लवकरात लवकर आपण अयोध्येला जाऊ असे ते म्हणाले होते.

'मुख्यमंत्रीपदाच्या अटीवरूनच तर सेनेनं लोकसेभेत युती केली'

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्ला विराजमान अर्थात हिंदू पक्षकारांना देण्याचे न्यायालयाने निकालात सांगितले. त्याचवेळी एकूण जागेपैकी पाच एकर जागा मुस्लिम पक्षकारांना देण्याचेही न्यायालयाने सांगितले. या निकालाचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले होते. या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतच त्यांनी आपण लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे म्हटले होते. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. त्यावेळी आपण राम मंदिराचा मार्ग लवकर मोकळा व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवरील माती घेऊन तिथे गेले होते, असे म्हटले होते.

अयोध्येच्या निकालात अनेक त्रुटी, यशवंत सिन्हा यांची टीका

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. यातून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. आता सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहेत. किमान समान कार्यक्रम तयार करण्यावर सध्या काम सुरू आहे. त्याचवेळी सत्तापदांचे वाटप करण्यावरही विचारविनिमय सुरू आहे.