पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंकडे पॉवर असू शकते, पण.., भीमा-कोरेगाव तपासावरुन काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

मल्लिकार्जुन खरगे (Pratik Chorge/HT Photo)

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावरुन महाविकास आघाडीमध्ये अजूनही धुसफूस सुरुच असल्याचे दिसत आहे. काँग्रेसनेही हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयावरुन नाराजी दर्शवली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 'हे योग्य नव्हते, अशा पद्धतीचे निर्णय घेताना आपल्या सहकारी पक्षांचा विचार घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) पॉवर आहे. पण त्याचा वापर विवेकाने करणे आवश्यक होते. आमचे पण मंत्री तिथे आहेत. ते यासाठी लढलेले आहेत,' अशी प्रतिक्रिया देत खरगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचाः शरद पवार

शुक्रवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला होता. हा तपास एनआयएकडे सोपवण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले होते. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या हातातून केंद्राने तपास काढून घेणे चुकीचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनेही या निर्णयाला पाठिंबा देणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले होते. महाराष्ट्र पोलिसांमधील काही व्यक्तींची (भीमा-कोरेगाव तपासात सामील असलेले) वर्तणूक ही आक्षेपार्ह होती. या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, अशी माझी मागणी पवार यांनी केली होती.

बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा

दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाने एल्गार परिषदेच्या कथित माओवादी संबंधांवरुन मानव अधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळला. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्याचा कालावधीही दिला आहे.