पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

J&K : सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना विमा संरक्षणाचे आश्वासन

अमित शहा

जम्मू काश्मीरमधील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांना पोलीस संरक्षणासह दोन-दोन लाख रुपांचे विमा संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. जम्मू काश्मीरमधील सरपंच आणि सदस्यांच्या एका प्रतिनिधीमंडळाने मंगळवारी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली.  

काश्मीरमध्ये एमटीडीसीचे दोन रिसॉर्ट होणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

शहांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना कुपवाडा येथील सरपंच मीर जुनैद म्हणाले, आम्ही गृहमंत्र्यांकडे सुरक्षेबाबत मागणी केली.  प्रशासनाकडून योग्य ती सुरक्षा पुरवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. श्रीनगर जिल्हायीतल हवन गावचे सरपंच जुबेर निषाद भट्ट म्हणाले, ग्रामपंचायतीमधील सदस्य आणि सरपंच यांनी २ लांखांचे विमा संरक्षण देण्याची ग्वाही देखील शहांनी दिली आहे. पुढील १५ ते २० दिवसांत जम्मू काश्मीरमधील मोबाईल सेवा पूर्ववत सुरु होईल, असेही शहांनी यावेळी सांगितले.  

ओएनजीसी प्लँट आगीमुळे मुंबईतीस गॅस पुरवठ्यावर परिणाम

जुनैद यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार सर्व आश्वासनांची पूर्ती करेल. उल्लेखनिय आहे की, जम्मू काश्मीमध्ये सहावर्षांच्या कालावधीनंतर मागील वर्षी पंचायत निवडणूका पार पडल्या होत्या.