जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरपासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या लावदारा गावामध्ये चकमक झाली. या चकमकीत रविवारी एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. तर आणखी एका दहशतवाद्यांला सोमवारी सकाळी ठार करण्यात आले.
#JammuAndKashmir: Two terrorists were killed in exchange of fire between security forces and terrorists in Bandipora, earlier today. Arms and ammunition recovered. Identity and affiliation being ascertained. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/sXOYdQFaet
— ANI (@ANI) November 11, 2019
भविष्यात काँग्रेसने शिवसेनेशी युती करुन निवडणूक लढवायची का?: निरुपम
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी लावदारा गावाजवळ लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला असता चकमक सुरु झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.
... त्याच्याशी आम्हाला काय घेण-देणं पडलंय?
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि तो कोणत्या दहशतवादी संघटनेचा आहे याचा तपास सुरु आहे. यापूर्वी ४ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये हरी सिंह हाय स्ट्रीट येथे दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले होते.