पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरः हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये सापडला डीएसपी

काश्मीरः हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये सापडला डीएसपी (संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे तपासणीदरम्यान एका वाहनात हिजबूल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांबरोबर कारमध्ये जम्मू-काश्मीर पोलिस दलाचा एक उपअधीक्षकही होता. हा उपअधीक्षक राष्ट्रपती पोलिस पदक विजेता आहे.

'चित्रपटाला अनुदान मिळाले नाही म्हणून अनुराग कश्यपकडून विरोध'

पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये सय्यद नाविद मुश्ताक उर्फ नाविद बाबूचाही समावेश आहे. हिजबूलचा सर्वोच्च दहशतवादी रियाज नाइकू नंतर नवीद बाबूचा क्रमांक येतो. दहशतवाद्यांबरोबर पकडण्यात आलेल्या पोलिस उपअधीक्षकाचे नाव देविंदर सिंह असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची नियुक्ती विमानतळावर होती. दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आसिफ राथर आहे. पोलिसांनी तिघांना कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंड येथील मीर बाजार परिसरातून अटक केली आहे. नाविद हिजबुलचा टॉप कमांडर आहे. तर राथर तीन वर्षांपूर्वी या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. दोघेही शोपियां येथील रहिवासी आहेत. 

सोशल मीडियावर मुंबईकर अंजिक्य-सचिन अन् वडा पावची चर्चा!

देविंदर सिंह यांना मागील १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. ते जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अँटी हायजॅकिंग स्क्वॉडमध्ये होते. सध्या त्यांची नियुक्ती श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. यापूर्वी २००१ मध्ये ससंदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले होते. तेव्हा ते विशेष मोहीम पथकात निरीक्षक होते. त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली होती.

शाळांमध्ये CAAचा प्रचार करणे मुर्खपणा, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर नेण्यासाठी पोलिस उपअधीक्षक मदत करत होते. हे दहशतवादी दिल्लीला येणार होते. पोलिस उपअधीक्षकाच्या घरी छापा टाकला असता, तिथे ५ ग्रेनेड आणि ३ एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आले आहे.