पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. शोपियाँ जिल्ह्यातील द्रगाड-सुगन गावामध्ये ही चकमक झाली. या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा शोध लष्कराचे जवान घेत आहेत.

द्रगाड-सुगन गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर या संपूर्ण भागाला वेढा घालण्यात आला. लष्कराचे जवान दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाजवळ पोहोचल्यावर त्यांच्यावर अंदाधूद गोळीबार करण्यात येऊ लागला. यानंतर लगेचच जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामध्ये सुरुवातीला एक आणि त्यानंतर दुसरा दहशतवादी ठार झाला. 

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. ज्यामुळे दहशतवाद्यांना या भागात घुसता येणार नाही. गुरुवारी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:two terrorist has been killed in the encounter at Dragad Sugan area of Shopian in kashmir