पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तांत्रिक बिघाडामुळे स्पाईसजेटची दोन विमाने मुंबई, नागपूरमध्ये उतरविली

स्पाईसजेट

उड्डाण केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आल्याने स्पाईसजेट विमान कंपनीच्या दोन प्रवासी विमानांना शनिवारी पुन्हा माघारी फिरावे लागले. यापैकी एक विमान मुंबईहून निघाले होते. ते परत मुंबईमध्ये उतरविण्यात आले. तर दुसरे विमान बंगळुरूहून निघाले होते. ते नागपूरमध्ये उतरविण्यात आले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. 

दिल्लीत धावपट्टीवर विमानाच्या टायरचे अवशेष, चिंता आणि सुखरूप लँडिंग...

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पाईसजेटच्या एका विमानाने शनिवारी सकाळी साडेसात वाजता उड्डाण केले. हे विमान चेन्नईच्या दिशेने निघाले होते. पण उड्डाणनंतर १६ मिनिटांतच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यावर ते पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने या घटनेला दुजोरा दिला असून, तांत्रिक कारणामुळे हे विमान माघारी आणण्यात आल्याचे म्हटले आहे. सकाळी दहाच्या सुमारास हे विमान पुन्हा चेन्नईच्या दिशेने रवाना कऱण्यात आले आहे.

स्पाईसजेटचेच बंगळुरूहून नवी दिल्लीकडे निघालेल्या विमानातही तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आल्यावर वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि त्यांना विमानाच्या मार्गात बदल करण्याची मागणी केली. त्यानंतर हे विमान नागपूरमध्ये उतरविण्यात आले. 

पाककडून भारतीय हद्दीत घुसलेले विमान जबरदस्तीने जयपूरमध्ये उतरवले, IAF ची कामगिरी

स्पाईसजेटने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तांत्रिक बिघाडामुळे हे विमान नागपूरमध्ये उतरविण्यात आल्याचे म्हटले आहे. विमानातील प्रवाशांना नागपूरमध्ये खाद्यपदार्थ देण्यात आले. दुसरे विमान नागपूरमध्ये मागविण्यात आले आणि त्या विमानाने प्रवाशांना नवी दिल्लीकडे नेण्यात आले, असे म्हटले आहे.