पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीर जवान

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. कुपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार सेक्टरमध्ये रविवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये दोन जावान शहीद झाले तर एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. 

निवडणूक भरारी पथकाने कारमधून ४ कोटी केले जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्यांना मदत करणयासाठी भारताच्या दिशेने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.  पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये दोन जवान शहीद तर एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. तसंच तीन स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. 

येत्या ४८ तासात राज्यात मेघगर्जनांसह जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरु आहे. भारतीय जवान या गोळीबाराला चोखप्रत्युत्तर देत आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने बारामुल्लामधील सीमा भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यामध्ये एक जवान शहीद झाला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:two soldiers and one civilian killed in ceasefire violation by Pak troops in jammu kashmir