पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ, दुतावास बॉम्बस्फोटांनी हादरले

इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर, दुतावासावर रॉकेट हल्ल्यासह बॉम्बफेक

इराणचे दुसरे सर्वांत ताकदवर नेते कासिम सुलेमानींचा अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्यावर त्याच्या एक दिवसानंतर इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ आणि दुतावास रॉकेट आणि बॉम्बहल्ल्यांनी हादरले. राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दुतावास आणि अल-बलाद एअर बेसवर शनिवारी रात्री उशिरा इराण समर्थक मिलिशियाने अनेक रॉकेट डागले. यादरम्यान इराकच्या हिज्बुल्लाने देशातील सुरक्षा दलांना अमेरिकन ठिकाणांपासून १००० मीटर दूर चालण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रॉकेट हल्ल्यानंतर धमकी दिली आहे. अमेरिकन लोक किंवा ठिकाणांवर हल्ला करणाऱ्यांना शोधून त्यांचा खात्मा केला जाईल, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर आम्ही त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करुन त्यांना संपुष्टात आणू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

खातेवाटप : अजित पवारांकडे अर्थ, आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण

तत्पूर्वी, शनिवारी रात्री उशिरा इराकची राजधानी बगदादच्या हरित पट्ट्यातील परिसरात अनेक बॉम्ब फेकले आणि अमेरिकन सैनिकांच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ले केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बगदादमध्ये शनिवारी सायंकाळी हरित पट्ट्यात रॉ़केट डागण्यात आले. हे अत्यंत उच्च सुरक्षा असलेले ठिकाण असून इथे अमेरिकेचा दुतावास आहे. एक रॉकेट या हरित पट्ट्याच्या आत येऊन पडल्याचे इराकी सैन्यदलाने सांगितले. या हल्ल्यानंतर परिसरात सायरन वाजू लागले आणि आकाशात हेलिकॉप्टर फिरताना दिसले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाले नसल्याचे सांगण्यात येते.

माझ्यावर कंट्रोल 'मातोश्री'चा, तिथंच मी बोलणारः अब्दुल सत्तार

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लेखोरांचा शोधून शोधून खात्मा केला जाईल, अशी धमकी दिली. इराणने जर अमेरिकन ठिकाणांवर हल्ला केला तर आम्ही इराणची ५२ ठिकाणे शोधून काढली आहेत. त्याच्यावर आम्ही हल्ला करु, असे ट्रम्प म्हणाले.