पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गो-एअर'च्या विमानात कबुतर, प्रवाशांचा उडाला गोंधळ

'गो-एअर'च्या विमानात कबुतर

'गो-एअर'च्या अहमदाबाद - जयपूरला जाणाऱ्या विमानात कबुतर शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. विमान उड्डाण घेत असतानाच कबुतर आतमध्ये शिरले असल्याचं समजलं. त्यामुळे कबुतराला बाहेर काढताना विमान कर्मचाऱ्यांच्या अक्षरश: नाकी नऊ आले.

केवळ मुलाशी बोलल्यामुळे मुलीला बेदम मारहाण, केसही कापले

अहमदाबाद एअरपोर्टवर गो एअरचे विमान जी 8-702 टेक ऑफ करण्यापूर्वी आत कबूतर शिरले. कबूतराला बाहेर पडण्यासाठी मार्गच सापडत नव्हता. घाबरून इतरस्त्र उडणाऱ्या कबूतरामुळे प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचा देखील गोंधळ उडाला. 

अखेर ग्राऊंड  स्टाफच्या मदतीनं विमानात शिरलेल्या या  'पाहुण्या'ला बाहेर हुसकावण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गोंधळामुळे विमान आपल्या निर्धारित वेळेपेक्षा जयपूर विमानतळावर अर्धातास उशीरानं पोहोचले. 

'मुसलमान असूनही भारतात स्वतःला सुरक्षित समजतो'