पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीमध्ये ४ मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू तर ३ जखमी

दिल्ली इमारत कोसळली

दिल्लीमध्ये चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दिल्लीच्या सीलमपूर भागामध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

पहिले राफेल विमान याच महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान ही इमारत कोसळली. दिल्लीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. तसंच आधीच ही इमारत खूप जुनी झाली होती. ही इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरी देखील यामध्ये अनेक कुटुंब राहत होती.  

उरण येथील ONGC प्लॅंटमध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू

या दुर्घटनेमध्ये मणी (२१ वर्ष), मोहम्मद यासीन (६५ वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर अरमान, शहजान बेगम आणि सम्शुद्दीन हे तीन जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अग्मिशन दलाच्या जवानाकडून बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता असून ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. 

८ अपाचे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात, सुरक्षा अधिक मजबूत