पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहांच्या नावाने ३ कोटी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

आरोपींना अटक

गृहमंत्रालयाचा अधिकारी असल्याचे सांगत हरियाणाचे मंत्री रंजीत सिंह यांच्याकडून ३ कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. गृहमंत्र्यांच्या नावावरुन पैसे उकळण्या प्रयत्न करणाऱ्या उपकार सिंह आणि जगतार सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी २० डिसेंबर रोजी एका अॅपच्या माध्यमातून रंजीत सिंह यांना फोन केला होता.

'२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारकडून वेगळा विचार'

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'अटक करण्यात आलेल्या आरोपींनी रंजीत सिंह यांच्याकडे अमित शहा पार्टी फंडच्या नावावर ३ कोटींची मागणी केली होती. या फोन नंबरचा तपास केला तेव्हा असा कोणताच फोन अमित शहा यांच्या घरातून केला नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती आणत दोघांना अटक केली.   

कोण प्रशांत किशोर?, केंद्रीय मंत्र्यांच्या प्रश्नाला असे मिळाले उत्तर

पोलिसांनी सांगितले की, 'अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं जगतार सिंह आणि उपकार सिंह अशी आहेत. हरियाणा सरकारचे मंत्री रंजीत सिंह यांना एका अॅपच्या माध्यमातून फोन करण्यात आला होता. त्या फोन नंबरवर पुन्हा फोन केला असता तो नंबर दुसऱ्याचा असल्याचे समोर आले होते.' 

बिहारमध्ये काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:two people arrested by delhi police on charges of impersonating as home ministry officials