जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर भारतीय लष्कराने पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. दोन्ही दहशतवाद्यांचा कबुलीजबाबाचा व्हिडिओ लष्कराने जारी केला आहे. श्रीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत पाकिस्तान दहशत पसरवत असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
#WATCH SRINAGAR: Indian Army releases confession video of two Pakistani nationals, who are associated with Lashkar-e-Taiba, and were apprehended on August 21. #JammuAndKashmir pic.twitter.com/J57U3uPZBl
— ANI (@ANI) September 4, 2019
लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे. २१ ऑगस्टला आम्ही दोन पाकिस्तानी घुसखोऱ्यांना पकडले आहे. हे दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाशी निगडीत आहेत.