कोरोना विषाणुच्या दहशतीमुळे जपानच्या किनाऱ्यावर थांबवण्यात आलेल्या जहाजमधील आणखी दोन भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोन रुग्णांसह कोरोनाची लागण झालेला भारतीय रुग्णांचा आकडा आता ६ वर पोहचला आहे. जपानमधील भारतीय दूतवासांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजातील आणखी ९९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात दोन भारतीय प्रवाशांचा समावेश आहे. डायमंड प्रिंसेस जहाजमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ४५४ वर जाऊन पोहचला आहे.
महात्मा गांधी स्वत:ला कट्टर सनातनी हिंदू मानायचे : मोहन भागवत
ताज्या माहितीनुसार जी दोन नावे समोर येत आहेत ती भारतीय चालक दलातील आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. यापूर्वी चार भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ज्या चार भारतीयांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती देखील दूतवासांनी दिली आहे.
ब्रिटनच्या महिला खासदाराचा भारत सरकारवर आरोप
जपान सरकार आणि जहाज कंपनी यांच्या समन्वयातून जहाजवर असलेल्या भारतीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती दूतवासांनी दिली. या जहाजमधून ३७११ लोक प्रवास करत होते. यात १३८ भारतीय नागरिक आहेत. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे हे जहाज किनाऱ्यावरच रोखण्यात आले होते.