पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीर: जवानांवर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच चकमक;१ जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या वाची येथे जवानांवर हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

मुंबई, पुणे, जयपूर, कोलकातामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर: गृह मंत्रालय

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शोपियां जिल्ह्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ जवानांसोबत एक संयुक्तरित्या अभियान चालवले. या अभियाना दरम्यान पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. वाची येथे तैनात असलेल्या जवानांवर ते हल्ला करणार होते. दहशतवाद्यांकडून एक पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. 

बंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन दरम्यान वाची भागात जवानांना तैनात करण्यात आले होते. त्यांच्यावर हे दहशतवादी हल्ला करणार होते. दरम्यान, पोलिसांकडून या दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरु आहेत. जवानांकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. 

कोरोना: अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊनमध्ये सूट, महामार्गावर टोलवसुली सुरु