पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा : देशातील २ कंपन्यांकडून रॅपिड टेस्ट किट्सचे उत्पादन सुरु

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्यासाठी शीघ्र निकाल देणाऱ्या एँटिबॉडी आधारित रॅपिड टेस्ट किट्सच्या उत्पादनाला देशातील दोन कंपन्यांनी सुरुवात केली आहे. या दोन्ही कंपन्यांना या टेस्ट किट्सच्या उत्पादनासाठी आवश्यक परवाने केंद्रीय औषधे दर्जा नियंत्रक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानंतर हे उत्पादन सुरू करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लवकरात लवकर मिळावी, यासाठी या टेस्ट किट्सचा उपयोग होणार आहे.

मुंबईमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

भारताने चीनकडून आधी रॅपिड टेस्ट किट्सची मागणी केली होती. हे किट्स आधी पाच आणि नंतर ९ एप्रिलला भारतात येतील, असे चीनकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी, १५ एप्रिलला या टेस्ट किट्स येतील, असे सांगण्यात आले होते. पण त्या दिवशीही हे किट्स आलेले नाहीत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने आता देशातच या टेस्ट किट्सच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देशातील तीन कंपन्यांनी रॅपिड टेस्टिंग किट्ससंदर्भात दिलेले नमुने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मंजुर केले होते. या तीन कंपन्यांमध्ये दिल्लीतील व्हॅनगार्ड डायग्नोस्टिक, केरळमधील एचएलएल लाईफकेअर लिमिटेड आणि गुजरातमधील व्हॉक्सटूर बायो लिमिटेड यांचा समावेश होता. आयसीएमआरच्या मंजुरीनंतर या तिन्ही कंपन्यांनी या किट्सच्या उत्पादनासाठी रितसर परवानगी मागणारे अर्ज सादर केले होते. 

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत २६०० रुग्णांचा मृत्यू

सध्या एचएलएल आणि व्हॉक्सटूर बायो लिमिटेड यांनी किट्सच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. २० एप्रिलपर्यंत एक लाख किट्स उपलब्ध होतील. व्हॅनगार्ड येत्या तीन आठवड्यांत उत्पादन सुरू करणार आहे.