पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जपानमध्ये एकाने २० जणांना भोसकले, दोघांचा मृत्यू

जपानमध्ये एकाने २० जणांना भोसकले (AP)

जपानमध्ये एक व्यक्तीने सुमारे २० लोकांवर चाकू हल्ला केला आहे. हल्लेखोराने मंगळवारी सकाळी जपानमधील कावासाकी शहरातील एक उद्यानात हा प्रकार केला. 'एएनआय'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. विविध माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, टोकियोतील दक्षिण भागात असलेल्या कावासाकी शहरात हा प्रकार घडला आहे.

टोकियो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात एका मुलासह दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्याच येते. घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार हल्लेखोराकडून दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत. हल्लेखोराने स्वतःही चाकूने भोसकून घेतले होते. त्यांने आपल्या खांद्यावर चाकूने वार केले होते. कावासाकी अग्निशामक दलाच्या प्रवक्त्याने 'एएफपी'ला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार एका व्यक्तीने बसस्टॉपजवळ गेला आणि स्वतःकडील चाकूने त्याने तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांना भोसकण्यास सुरुवात केली. लोकांना काही कळायच्या आतच त्याने अनेकांवर हल्ला केला होता. हल्ला झालेल्या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन अत्यंत जवळ होते.

जपानमधील स्थानिक माध्यमांवर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.