पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीओकेत आंदोलकांवर लाठीचार्ज, दोघांचा मृत्यू

पीओकेत आंदोलकांवर लाठीचार्ज, दोघांचा मृत्यू (ANI)

शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आपली ढासळलेली अवस्था लपवणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. पाक व्याप्त काश्मीरमधील (पीओके) मुझफ्फराबादमध्ये मंगळवारी ऑल इंडिपेंडंट पार्टीज अलाइन्सच्या (एआयपीए) नेतृत्वाखाली अनेक राजकीय पक्षांनी एका सभेचे आयोजन केले होतो. याचदरम्यान आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Infosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले

पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर एकच पळापळ झाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. तर काही लोकांनी तोंडाला कापड लावून राजकीय पक्षांचा विरोध करु लागले.

नवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले

तत्पूर्वी, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी रविवारी इम्रान खान सरकारवर निशाणा साधला. इम्रान खान सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता.

आधार 'सोशल'ला जोडण्याची सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात