पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्तीसगड चकमकीत २ कोब्रा कमांडो शहीद, एका नक्षलवाद्याचाही खात्मा

संग्रहित छायाचित्र

छत्तीसगडमधील बस्तर येथे नक्षल्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा बटालियनचे दोन जवान शहीद तर चार जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत एका नक्षलवाद्याचाही खात्मा करण्यात आला आहे. 

कर्जत उपकारागृह फोडून खून, दुष्कर्माचे ५ आरोपी पळाले

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस्तर विभागातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील इरापल्ली गावात सोमवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास चकमक सुरु झाली. यात एक नक्षलवादी मारला गेला. त्याची शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आले आहेत. 

याचदरम्यान सीआरपीएफच्या स्पेशल यूनिट कमांडो बटालियन फॉर रिलोल्यूट ऍक्शनचे (कोबरा २०४ बटालियन) दोन जवान शहीद झाले. अजूनही शोध मोहीम सुरु आहे. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हिंगणघाट प्रकरणी ग्रामस्थ संतप्त; पोलिस आणि रुग्णवाहिकेवर दगडफेक

काय आहे कोब्रा बटालियन
सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनची स्थापना प्रामुख्याने नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनसाठी २००८ मध्ये करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यात कोब्रा बटालियनचे यूनिट आहेत. २०१ बटालियन जगदलपूर (छत्तीसगड), २०२ बटालियन कोरापुट (ओडिशा), २०३ बटालियन सिंदरी, झारखंड, २०४ बटालियन जगदलपुर (छत्‍तीसगढ), २०५ बटालियन मोकामाघाट (बिहार), २०६ बटालियन गढचिरोली (महाराष्‍ट्र), २०७ बटालियन दुर्गापुर (पश्चिम बंगाल), २०८ बटालियन प्रयागराज (उत्तर प्रदेश), २०९ बटालियन खूंटी (झारखंड), २१० बटालियन दलगाव (आसाम).