पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार; २ नागरिकांचा मृत्यू

सीमेवर तेैनात जवान (संग्रहित छायाचित्र) .(Nitin Kanotra /HT File Photo )

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागांमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गेल्या २४ तासांपासून थांबून थांबून गोळीबार सुरुच आहे. सोमवारपासून पाकिस्तानी सैन्य पुछ जिल्ह्यातील सीमा भागांतील रहिवासी वस्ती आणि जवानांच्या चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार करत आहे. रहिवासी भागामध्ये पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारात २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. 

 

'माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास, बंडखोरी माझ्या रक्तात नाही'

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने मंगळावारी दुपारी अडीचच्या सुमारास पुंछ जिल्ह्यातील दोन सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्यांनी पुछच्या शाहपूर आणि केरनी सेक्टरमध्ये १८२ एमएमचे मोर्टारने हल्ला केला. यामध्ये या भागातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. 

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारात दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त ७ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीमा भागांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. लष्कराकडून सीमा भागातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मग आम्ही नक्की कुठे सुरक्षित आहोत?, रॉबर्ट वाड्रा यांचा सवाल