पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन; दोन जवान शहीद

सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ हे हिमस्खलन झाले.

जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीनमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन झाले आहे. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. दक्षिण सियाचीन ग्लेशियर भागामध्ये १८ हजार फूट उंचीवर लष्कराचे गस्तीपथक हिमस्खलनात अडकले.

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहा मुंबई दौऱ्यावर

एवलांच रेस्क्यू टीम (एआरटी) यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटने दरम्यान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व जवानांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवानांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. मात्र यामधील दोन जवान शहीद झाले. 

फडणवीसांनी खडसेंकडे 'क्लास' लावावा: नवाब मलिक

याआधी सियाचिन ग्लेशियर भागामध्ये १८ नोव्हेंबर रोजी हिमस्खलन झाले होते. यामध्ये लष्काराचे ४ जवान शहीद झाले होते. तर दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या ८ जवानांचे पथक हिमस्खलनात अडकले होते. रेस्क्यू टीमने त्यांना बाहेर काढले. मात्र त्यामधील ४ जण शहीद झाले होते. 

'२२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल'