पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'

प्रियांका गांधी

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर 'ट्विटरवाली नेता' म्हणून टीका केली. प्रियांका गांधी काय म्हणतात, याला काहीही किंमत नाही, असाही टोला त्यांनी लगावला. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशात उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक आहे. त्यावरून प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. त्याला केशवप्रसाद मौर्य यांनी उत्तर दिले आहे.

नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा

केशवप्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, प्रियांका गांधी या फक्त ट्विटरवाल्या नेत्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना त्यांच्या भावाला विजय मिळवून देता आला नव्हता. त्या काय म्हणतात याला काही किंमत नाही. आमच्यासाठी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आम्ही काय उपाययोजना करतो आहोत, हे जास्त महत्त्वाचे आहे. 

झारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश

योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना प्रियांका गांधी यांनी म्हटले होते की, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये देशात उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यानंतर केशवप्रसाद मौर्य यांनी ही टीका केली. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोचा २०१७ वर्षासाठीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यातील निरीक्षणांच्या आधारावर प्रियांका गांधी यांनी टीका केली होती.