पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्विटरवर राजकीय जाहिराती आजपासून बंद

प्रातिनिधिक छायाचित्र

ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटनं अधिकृतपणे जागतिक स्तरावरावरील सर्व राजकीय जाहिराती स्वीकारणे बंद केले आहे. 'ट्विटर'चे सीईओ जॅक डॉर्सी यांनी यापूर्वी ट्विटवरून यापुढे कोणत्याही प्रकारच्या राजकीय जाहिराती स्वीकारल्या जाणार नाही  अशी माहिती दिली होती. त्यानंतर  या आठवड्यापासून जॅक यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तेव्हा आजापासून ट्विटर कोणताही उमेदवार, पक्ष, सरकार, अधिरकारी, नेते, राजकीय संस्था आदींकडून राजकीय जाहिराती स्वीकारणार नाही, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. 

महात्मा गांधींचा मृत्यू अपघाती; ओडिशामध्ये राजकारण तापले

कोणत्याही प्रकारच्या राजकीय मजकूराची जाहिराबाजी करण्याच्या संकल्पनेचं ट्विटर खंडन करत आहे. राजकीय संदेश हा जनसामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांपर्यंत पोहचायची कला कमवावी लागते, ती विकत घेऊन चालत नाही असं आम्ही मानतो, आणि याच मान्यतेवर आम्ही राजकीय जाहिराती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचं ट्विट कंपनीनं शुक्रवारी केलं आहे. 

..म्हणून इन्स्टाग्राम एकूण ‘likes’चा आकडाच टाकणार काढून

'इंटरनेटवरून जाहिरात करणं हे व्यावसायिक जाहिरातदारांसाठी अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असलं तरी यामुळे राजकारणासाठी काही मोठे धोके निर्माण होतात,' असं ट्विट  सीईओ जॅक डॉर्सी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी केलं होतं. ट्विटरच्या या निर्णयामुळे आता फेसबुकसारख्या मोठ्या सोशल मीडिया साइटवर दबाव वाढला आहे.